नागरीकांची सनद
वस्तू व सेवाकर विभाग
महाराष्ट्र शासन
प्रस्तावना:
नागरिकांची सनदेचा हेतू वस्तू व सेवा कर विभागाची उदिष्टे, जबाबदाऱ्या,राबविण्यात येणारे कायदे, पुरविल्या जाणाऱ्या सेवा व समयमर्यादा याबाबतची माहिती देणे.
वस्तू व सेवाकर विभागः
• वस्तू व सेवाकर विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत येतो.
• वस्तू व सेवाकर विभाग हा महाराष्ट्र शासनासाठी महसूल गोळा करणारा महत्वाचा विभाग आहे.
• वस्तू व सेवाकर विभागाचे मुख्यालय वस्तू व सेवाकर भवन, माझगांव, मुंबई ४०० ०१०. येथे आहे.
उद्दिष्ट:
व्यवसाय सुलभता तत्वांचा अवलंब करून पुरोगामी कर धोरणांची अंमलबजावणी करणे.
ध्येय:
• कायद्याच्या कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाद्वारे महसूल गोळा करणे.
• कार्यक्षम, पारदर्शक, प्रतिक्रियाशील, स्वयंप्रेरित आणि उत्तरदायी प्रशासन.
कर्तव्ये :
• सौजन्यपूर्वक व तत्पर माहिती पुरविणे.
• कायद्यातील करदात्यांचे कायदेशीर अधिकार, कर्तव्ये, कार्यपद्धती बदल/ सुधारणा याबद्दल माहिती प्रसारित करून आणि करदात्यांचे ज्ञान अद्ययावत करून करदात्यांचे सशक्तीकरण करणे.
• कर प्रशासनात सुधारणा होण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता करदात्यांच्या तक्रारींचे निवारण आणि अभिप्राय प्राप्त करण्यासाठी क्षेत्रीय व विभागीय स्तरावर सेवा कक्षाच्या आणि तक्रार निवारण समितीच्या नियमित बैठक आयोजित करणे.
• कायदे, नियम आणि नियमन आणि वेगवेगळ्या कायद्यांच्या सुलभ अंमलबजावणीसाठी आणि उत्तम कर अनुपालन होण्यासाठी कार्यपद्धतींचा आढावा घेणे.
• सचोटीला चालना देण्यासाठी व्यापक राष्ट्रीय अभियानाचा भाग म्हणून भ्रष्टाचाराशी प्रभावीपणे लढा देणे.
• सेवा वितरण मानकांचा दर्जा सतत वाढविणे.
जबाबदाऱ्या :
• अधिनियमांतर्गत आवश्यक सेवा कालमर्यादेत उपलब्ध करणे.
• विभागाच्या संकेतस्थळाचे नियमित अद्ययावतीकरण करणे आणि या संकेतस्थळाच्या अधिकाधिक वापराबाबत जागरुकता निर्माण करणे.
• करदात्यांच्या तक्रारींना विहित वेळ मर्यादेत प्रतिसाद देणे.
• कायदे, नियम व कार्यपध्दती अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी व त्याच्या सुलभ अंमलबजावणीसाठी पुनर्विलोकन करणे.
विभागाची संरचना आणि पदक्रम :
१. राज्यकर आयुक्त, विभागप्रमुख
२. विशेष राज्यकर आयुक्त.
३. विशेष पोलिस महानिरीक्षक (दक्षता)
४. अपर राज्यकर आयुक्त
५. राज्यकर सहआयुक्त
६. राज्यकर उपायुक्त
७. सहाय्यक राज्यकर आयुक्त
८. राज्यकर अधिकारी.
९. राज्यकर निरिक्षक, राज्य कर सहाय्यक, लिपीक आणि इत्तर कर्मचारी.
१०. वर्ग ४ कर्मचारी.
महत्वाचे कर व कायदे:
१. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, २०१७
२. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७
३. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७
४. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२
५. केंद्रीय विक्रीकर कायदा, १९५६.
६. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, धंदे, आजिविका आणि नोकरीवरील कर कायदा, १९७५.
पूर्वीचे कायदे
१. मुंबई विक्रीकर अधिनियम, १९५९ (३१.०३.२००५ पर्यंतच्या कालावधीसाठी)
२. मुंबई मोटार स्पिरीट विक्री कराधान अधिनियम, १९५८ (३१.०३.२००५ पर्यंतच्या कालावधीसाठी)
३. महाराष्ट्र कार्यकंत्राट अधिनियम, १९८९ (३१.०३.२००५ पर्यंतच्या कालावधीसाठी))
४. महाराष्ट्र भाडेपट्टी कर अधिनियम, १९८५
५. महाराष्ट्र ऐषआराम सेवांवरील कर अधिनियम, १९८७
६. महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रांमध्ये मोटार वाहने आणण्याकरीता कर अधिनियम, १९८७.
७. महाराष्ट्र ऊस खरेदी कर अधिनियम, १९६२
८. महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रात मालाच्या प्रवेशावरील कर अधिनियम, २००२
९. चिटफंड कायदा १९८२.
संकेतस्थळ-
व्यवसाय कर, मुल्यवर्धित कर केंद्रीय विक्रीकर अंतर्गत नोंदणी उदयोग विभागाच्या मैत्री पोर्टलवर देखील उपलब्ध आहे.
मदत कक्ष-
संपर्क क्रमांक: 022-23760188
ई-मेल आयडी: helpdesksupport@mahagst.gov.in
विभागाकडून पुरविल्या जाणाऱ्या सेवा
अनु. क्र. | विषय |
मुख्य सेवा
|
शुल्क
|
कालमर्यादा
|
१ |
नोंदणी
|
व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र (PTRC/PTEC) अंतर्गत नोंदणी
|
निरंक
|
१ दिवस
|
मुल्यवर्धित कर कायद्यांतर्गत नोंदणी
|
रु. ५००
|
३ दिवस
|
||
मुल्यवर्धित कर कर कायद्यांतर्गत ऐच्छिक नोंदणी
|
रु. ५०००
|
३ दिवस
|
||
वस्तु व सेवा कर कायद्यांतर्गत नोंदणी
|
निरंक
|
०७ दिवस
३० दिवस (आधार प्रमाणीकरण नसेल तर)
|
||
२ |
परतावा
|
वस्तु व सेवा कर कायद्यांतर्गत परतावा
|
निरंक
|
६० दिवस
|
मुल्यवर्धीत कर कायद्यांतर्गत अंशत: परतावा
|
निरंक
|
९० दिवस | ||
ऐच्छिक नोंदणी रकमेचा परतावा
(मुल्यवर्धीत कर कायद्यांतर्गत)
|
निरंक
|
कायदयाप्रमाणे | ||
३ | घोषणापत्र |
केंद्रीय कर कायद्यांतर्गत
'क' , फ' इत्यादी घोषणापत्र जारी करणे ( वस्तु व सेवा कर कायदयातंर्गत अंर्तभूत नसलेल्या वस्तूसाठी)
|
निरंक
|
७ दिवस
|
४ |
माहिती तंत्रज्ञानांतर्गत तक्रारी
|
आयटी (IT) तक्रार निवारण
|
निरंक
|
तात्काळ पाठपुरावा
|
आमचा महत्त्वाचा संपर्क तपशील:
संबंधित क्षेत्रातील करदात्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जवळजवळ सर्व जिल्हास्तरावर कार्यालये आहेत.
अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील आणि तक्रार निवारण यंत्रणेसह मदत कक्षाचे संपर्क तपशील आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कृपया www.mahagst.gov.in या विभागीय संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील विभागाविषयी या पर्यायाखालील आमच्याशी संपर्क या सदरात माहिती उपलब्ध आहे.
राज्यकर आयुक्त
महाराष्ट्र राज्य, मुंबई